Marathi Ukhane For Female| महिलांसाठी मराठी उखाणे |
Marathi Ukhane For Female| महिलांसाठी मराठी उखाणे |Marathi Ukhane | मराठी उखाणे
गोकुळच्या गोड गाण्यात, राधा कृष्णाचा साज सजला,…………रावांचे नाव घेते,आयुष्यभराची साथ भेटली मजला.
यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून, नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा,………… राव हवेत मला जोडीदार म्हणून ,७ जन्मी पुन्हा.
लग्न म्हणजे आहे एक,संसारातील पूल,………… रावांनी दिली जबाबदारी आता मला,घर आणि चूल.
सोहळे होतात ऋतूंचे सर्व,त्यांच्या तरेने,…………रावांसोबत लग्न झाले, दोन्ही कुटुंबांच्या म्हणण्या प्रमाणे.
नेसला नवा शालू,घातली नाकात नथ,…………रावांचे नाव घेते,आज पासून चालवेन नवीन संसाराचा रथ.
नक्षीदार अशा सुंदर मंडपी, जमली सारी थोर मंडळी,…………… रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने,जमली आमची कुंडली.
आमचे लग्न ठरत असताना,खूप आल्यात बाधा,…………… राव माझे कृष्ण,आणि मी त्यांची राधा.
ज्यांची पाहिली होती वाट,ते सुख आले दारी,……….. रावांसोबत सुरू झाली आता संसाराची स्वारी.
विवाह म्हणजे सुरुवात एका नवं जीवनाची ______ चे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची.
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध _____रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध
एका वर्षात, महिने असतात बारा,_____वाढलाय, आनंद सारा!
अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा _______रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा.
काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून,_____नाव घेते सर्वांचा मान राखून.
शेतामध्ये पावसात, नाचत होता मोर,_____रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर.
दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,_______रावांसखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.
खुश ठेवा मला, नको माणिकमोती,________राव नेहमी रहा, तुम्ही माझ्यासोबती.
पैठणीवर शोभे, सुंदर मोरांची जोडी,______रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
आई, वडील माझे पहिले गुरु,______ रावांचे नाव घेऊन उखाणा करते सुरु.
लग्नाच्या आधी बांधला बंगला,_______रावांच्या प्रपंच्यात जीव माझा रंगला.
जीवनाच सोन करेन, सगळ सुख मी तुला देईन,______रावांचे नाव आजपासून मी, सगळीकडे घेईन.

गळ्यात मंगळसूत्र, ही सौभाग्याची खून______रावांचे नाव घेते _____सून.
Marathi Ukhane For Female| महिलांसाठी मराठी उखाणे |ukhane marathi
लग्नासाठी मुले पाहिले,सतराशे साठ, अखेर ______रावांशी बांधली, लग्नाची गाठ.
शब्दही न बोलता, साद घातली कुणी_____राव आहेत माझ्या दिलाचे धनी.
उंच मनोरे, नव्या जगाचे _____रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.
रंग हे नवे, गंध हे नवे _____रावांची साथ, मला सात जन्मी हवी.
देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले, खूप खुश आहे आज, मी कारण _____सोबत माझे लग्न जुळाले.

आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज_____रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते_____राव मला नको अजून काही, मी फक्त तुमच्यावर मरते.
आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,_____रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.
जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात______ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.
visit our site wishwala. in