Marathi Ukhane For Male |Navardevasathi Marathi Ukhane | पुरुषांसाठी मराठी उखाणे
marathi ukhane for male |Navaradevasathi marathi ukhane | ukhane marathi |marathi ukhane for male
सुंदरात सुंदर,प्रेमाचे गाव………….समोर लागणार,आता माझे आडनाव.
सुंदर झाडावर,कोकिळा गाते गाणी,…………..राहील सदैव माझ्या मनी.
प्रेमाची कविता,प्रेमाचे लेख………………माझी लाखात एक.
गोड मधूर आवाज करी कृष्णाची बासरी,…………… ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
कृष्णाला बघून राधा हसली,…………माझ्या हृदयात बसली.
प्रेमाच्या रानात नाचतो मोर,………… शी केलं लग्न,नशीब माझं थोर.
प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट,………… च नाव घेतील माझे हे ओठ.
खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,…………… माझी सगळ्यात देखणी.
कृष्णाचे नाव,सारखे माझ्या मुखी,…………. ला ठेवीन,आयुष्यभर सुखी.

समुद्राचे पाणी लागते खूप खारे,_____तुझ्यासाठी तोडून आणेल मी चंद्र तारे.
ती पुण्याची मिसळ, मी मुबंई चा वडापाव, लग्नाला हो म्हणायला _____ ने खाल्ला जास्तच भाव.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री _____झाली आज माझी गृहमंत्री.
दोन जन्माचे मीलन जणू शतजन्माच्या गाठी,______च नाव घेतो तुमच्या आग्रहसाठी.
नाते असावे अतूट, आणि घट्ट,_____चे पुरवेन मी, सर्व हट्ट.
काय जादू केली, जिंकलं मला एकक्षणात, प्रथम दर्शनीय भरली _____माझ्या मनात.
नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,______चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.
लक्ष लक्ष दिव्यासारखं उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,_______ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव प्रेम.
आकाशात उडतो पक्षांचा थवा,________च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,_______च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,______च्या रूपाने, झालो मी बेभान.
एक होती चिऊ, एक होता काऊ,_____च नाव घेतो, डोकं नका खाऊ.
निळ्या निळ्या आकाशात, चमचमणारे तारे _______च नाव घेतो, लक्ष द्या सारे.
तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट, पण बघता बघता ________ च्या प्रेमात पडली माझी विकेट.
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,________ने दिला मला प्रेमाचा हात.
पुरणपोळीत तूप असावे साजूक,_________आहेत आमच्या नाजूक.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,________ चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
काही शब्द येतात ओठांतून,__________चं नाव येतं मात्र हृदयातून.

प्रेम म्हणेज दोन मनांना जोडणारा पूल ________च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल.
पार्लेची बिस्किटे बेडेकरांचा मसाला ________नाव घ्यायला आग्रह कशाला.
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व _______आहे माझे जीवन सर्वस्व.
पाहताच ________ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंग च्या वेडापायी रिकामा होतो माझा खिसा.
भल्यामोठ्या समुद्रात छोटीशी होडी _________ची आणि माझी लाखात एक जोडी.
कोकिळेचा आवाज वाटतो खूपच गोड ________ला जपतो मी जसा तळहाताचा फोड.
Marathi Ukhane For Male |Navardevasathi Marathi Ukhane | पुरुषांसाठी मराठी उखाणे
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर ________माझी सर्वांपेक्षा सुंदर.
रायगड किल्ला बांधायला कारागीर होते कुशल _______चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ________च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
मोह नाही, माया नाही, नाही कसला हेवा ______चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
दुर्वांची जोडी वाहतो गणपतीला ______सारखी बायको मिळाली खूप आनंद झाला मला.
संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका ________चे नाव घेतो सर्वांनी कान लावून ऐका.
पुरणपोळीत तूप आहे साजूक _______आहे आमची फारच नाजूक.
कोल्हापुरात आहे लक्ष्मीचा वास ______भरवतो गुलाबजामूनचा घास.
भाजीत भाजी मेथीची…… माझ्या प्रीतीची.

आकाशात उडतो पक्षांचा थवा _______च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
मुद्दाम नाही करत, नकळत घडत, माझं मन रोज नव्याने,______च्याच प्रेमात पडत.
हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि ______किती टिंगू.
दवबिंदूनी चमकतो, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात,_______च्या संग.
हिरव्यागार मैदानात, खेळत होतो क्रिकेट,_________ला पाहून, पडली माझी विकेट.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,_______समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वर्शी.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,________च्या रूपाने, झालो मी बेभान.
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,________चे नाव घेतो, ऐका देऊन कान.
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,_________चे नाव घेतो, पुढचं नाही पाठ.
कावळा करतो काव काव, चिमणी करते चीव चिव,_________चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.
डाळीत डाळ, तुरीची डाळ,________च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,घायाळ करतो ________च्या, गालावरचा तीळ.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,________च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
ती सोबत असली कि, खराब मूड होतो बरा,__________मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
visit our site www.wishwala.in







